लेखणी

   


                                                            । ।  लेखणी । ।


बघा पटलं तर 


……..लहान पणी शाळेत असतांना आजच्यासारखे online  , डिजिटल सोशिअल मीडिया वगैरे असले काही प्रकार नव्हते . त्यावेळचे एकच प्रभावी माध्यम म्हणजे पुस्तक ! Tv माध्यम अगदीच १०% लोकांकडे ,त्यामुळे जसे आईवडिलांनी आमच्यावर संस्कार केले तसेच या पुस्तकांनीही बरच  काही शिकवलं ! शालेय जीवनाबरोबरच विद्यालयात शिक्षण घेत असतांना खऱ्या अर्थाने लेखणीशी संबंध आला .त्याचे असे झाले संवाद करणे किंबहुना संवाद घडवणे हे माझ्या रक्तातच होते , एकदिवस विद्यालयाचे प्राध्यापक म्हणाले , आपल्या विद्यालयाच्या कला विभागाच्या वार्षिकामध्ये तुझ्यासाठी दोन पाने ठेवली आहेत , विषय तूच निवड पण चर्चा खुप केल्यास, आता लेखणी हातात घे .केवळ शिक्षकांच्या आग्रहाखातीर मी पहिल्यांदा लेखणी हातात घेतली , त्यावेळी “ श्री आचार्य अत्रे , पु.ल. देशपांडे , व.पु . काळे , रत्नाकर मतकरी , सुरेश खरे अश्या दिग्गज लेखकांची पुस्तके आणि लेख वाचनात आले . किंबहुना त्यांचे लेख किंवा पुस्तक वाचणे एक व्यसनच लागले होते .त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा प्रभाव माझ्यावर झाला होता.लेखणीची ताकद काय असते ती  श्री आचार्य अत्रेयांच्या लिखाणातून दिसत होती इतकेच कशाला इतिहासाची पाने उलगडून पहिली तर कळते लोकमान्य टिळकांच्या लेखणीला किती ताकद होती त्यांच्या नुसत्या लिखाणाने इंग्रज सरकार खडबडून जागे व्हायचे .

                                                                                            या लेखणीचे एक वैशिष्ठ्य होत कि ज्याने लेखणी हातात घेतली त्याला ज्ञान , अनुभव , आणि विचारांचे विचार मंथन करण्याची सवय  , आणि लेखणी चालवण्याची कला या सर्व गोष्टी आवश्यक होत्या तरच त्याची लेखणी तळपायची ! त्यावेळी अनेकांच्या लेखणीने समाजसुधारण्याचा जणू विडाच उचलला होता .यामध्ये कवी मनही मागे नव्हते काही कवींच्या लेखणीतून अश्या कविता लिहिल्या जायच्या कि वाचल्या नंतर अन्याय विरुद्ध लढण्याचे धैर्य निर्माण व्हायचे काहींच्या कविता वाचल्यानंतर डोळ्यातून घळाघळा पाणी यायचे. लेखणीचा परिणाम प्रत्येक दिवशी दिसत असे , किंबहुना योग्य  मार्गाने जाणारे इतिहास ही या लेखणीने घडवले  . लेखणीला दुधारी तलवार असेही म्हणत !

कोणीही येईल आणि लेखणीला हातात घेईल हे लेखणीलाच मान्य नव्हतं जेव्हा गाढ अनुभव ,प्रामाणिक अभ्यास , लिखाणाचे  तारतम्य ,  बुद्धिमत्ता आणि लेखणीला चालवण्याचे कष्ट ! हे सर्व ज्याचे जवळ असतील  त्याच्याच लेखणीला ताकद यायची, त्यामुळे फाजील व्यक्तिस्वातंत्राला वावच नव्हता .  कुरघोडीही व्हायच्या पण त्याच्या पत्रावळी कधीच झाल्या नाहीत .,त्यात तारतम्य आणि संयम असल्यामुळे कचरा होण्याची शक्यताच नव्हती 

                                                                                  लेखणीची धार ……..आता लेखणीच कुठे दिसते , मोबाईल च्या रीळ ने तिला कधीच गिळंकृत केले आहे , लेखणी गेली तशी वाचून पेटून उठणारी मनेही संपली . आता दिसतात त्या फक्त एकमेकांवरील कुरघोडींच्या पत्रावळी , ज्यातून काहीच निष्पन्न होणार नाही . झालेच तर कायमस्वरूपीचे वाद आणि मारामाऱ्या . कोणीही यावं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे धिंडवडे काढावे अशी गत  झाली आहे , तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला जातो . तारतम्य आणि संयम समाजामधून कधीच हद्दपार झाले आहेत !ज्याची समाज सुधारणे साठी , आणि समाज शांततेसाठी अत्यंत गरज असते. समाजात पुन्हा लेखणी चे अस्तित्व येईल का ? 

                  —------------------------------------- क्षितिजा —---- गणेश वेलणकर ……. क्षितिज सोशिअल मीडिया 


आदर्श - Ideal

                                                                          “ आदर्श “


पहा पटलं तर 



……..लहान पणी शाळेत असतांना ‘ आदर्श “ या शब्दाची अनेक वेळा गाठ भेट व्हायची , शालेय मन हे संस्कार क्षम असल्यामुळे कुणाचातरी आदर्श डोळ्यासमोर ठेऊन किंबहुना त्या आदर्शाला , आजच्या सो कॉल्ड भाषेत सांगायचं झालं तर Follow करणे गरजेचे आहे , हा नुसते बोट फिरवून   Follow करण्या ऐवजी कृतीतून  Follow करणे गरजेचे आहे ,आणि  त्यातूनच देशाची राज्याची उज्वल पिढी घडत असते . तसेच काहीसे आदर्श म्हणावे असे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आहे ते म्हणजे श्री तुकाराम मुंडे साहेब, इतिहासात पण आपण वाचलेले आहे, आदर्श पुरुषांना सामाजिक विचारांना , समाजाच्या विरोधाशी संघर्ष करून समाजासाठीच काहीतरी चांगले घडवायचे असते आणि त्यात ते यशस्वी होतात आणि म्हणुत ते आदर्श होतात . 
                                               पण श्री तुकाराम मुंडे साहेब यांच्याबाबतीत खूप वेगळी गोष्ट आहे किंबहुना प्रथमच घडत असावी. आणि ती म्हणजे  श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी त्यांच्या शासकीय कामामुळे,  जी शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराच्या दलदलीत स्वइच्छेने अडकलेली आहे ती खडबडून जागी व्हावी नव्हे किंबहुना शासकीय बल  वापरून त्यांचे काम बंद करावे , अशीच परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे .महत्वाचा फरक असा कि जवळपास ८० % टक्के समाज त्यांच्या कार्याचे समर्थन करणारा आहे . त्यामुळे समाजाचा प्रचंड पाठिंबा आहे , विरोध आहे तो ताकदवर असलेली शासकीय यंत्रणा !
                                              आदर्श या साठी म्हणावेसे वाटते कि त्या  ताकदवर असलेल्या  शासकीय यंत्रणेलाही त्यांनी जुमानलें  नाही. मला शिक्षा म्हणून माझी बदली करताय - करा  ती शिक्षा मला बक्षिस दिले आहे असे समजून मी पुढची वाटचाल करिन ! केवढे मोठे धाडस . “ हे असेच चालायचे - यात आपण काही बदल घडवू शकत नाही “, अशी विचारधारा स्वीकारत असलेल्या समाजात अचानक वादळ निर्माण झालं  . “ का असेच चालवायचे ?, माझे कर्तव्य ,माझे अधिकार आणि माझा प्रामाणिक पणा योग्य प्रकारे वापरला  तर आपणही बदल घडवू शकतो . हा आदर्श !अर्थात त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्या कुटुंबाची साथ मिळाली नव्हे  प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते तशी त्यांची पत्नी उभी होती. हा आदर्श ! 
                                                आज गरज आहे ती श्री तुकाराम मुंडे साहेब, यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक तरुणाने जीवनात वाटचाल करावी , भले कष्टमय जीवन झालं तरी चालेल पण लाचारकी पत्करणार नाही, हा एकच  बळकट असलेला विचार बरंच काही समाजात , शासकीय यंत्रणेत चांगले बदल घडवू शकतो !  —--
                —--- क्षितिजा —-----गणेश वेलणकर -                           @ क्षितिज सोशिअल मीडिया 


असा प्रसंग - अशी वेदना

                                                                         । ।   श्री  । । 


                                            असा प्रसंग - अशी वेदना


मी कोल्हापूर ST स्टॅन्ड मध्ये शिरलो ,अक्कलकोट -देवगड गाडी फलाटला लागलेलीच होती .गाडी पूर्ण भरलेली होती उभे प्रवासी हि बरेच होते पण आत जायला जागा होती , माझ्याबरोबर काही प्रवासी आत शिरले तशी कंडक्टर गरजला " वैभव वाडी ला जाणाऱ्यांनी मागे चला , मला देवगडला जायचं होत त्या मुळे मी मागे येऊन उभा राहिलो . कंडक्टरनी बेल वाजवली आणि लगेचच गाडी सुरु झाली . समोर सीटवर काळीसावळी मुलगी बसली होती चेहऱ्यावरून ती कोल्हापूरचीच असावी असा मी तर्क केला , गळ्यात मंगळसूत्र होतं म्हणजे लग्न झालेलं होत . एकदोनदा एकमेकांकडे बघितलं ,  तिने थोडं स्माईल हि केलं , मुलगी स्मार्ट आणि कोणालाही तीच्या  बद्द्ल आत्मीयता वाटेल असे सालस चेहऱ्यावर भाव होते . " तुम्ही बसा मी उठते " , माझ्याकडे पाहत  ती म्हणाली. "नको नको तुम्ही बसा मला मिळेल जागा बसायला " मी म्हटलं .  , ती  मुलगी लग्न झालेली  असली  तरी माझ्या मुलीच्याच वयाची होती .  पण त्या मुलीने ऐकलं नाही ती जाग्यावरून उठली , माझा नाईलाज झाला , मला बसणं   भाग होत . खिडकीशी एक साधारण सत्तरीच्या आसपास असलेले वयस्कर गृहस्थ बसलेले होते , त्यांना थोडं सरकायला सांगून मीही  आक्रसून बसलो आणि तिलाही बसायला थोडी जागा करून दिली. ती मुलगी बसली . मला राहून राहून वाटत होत , का त्या मुलीने  मला बसायला जागा दिली  . काही ऋणानुबंध होता का ? मी वयस्कर उभा म्हणून तिने बसायला जागा दिली यात काही शंकाच नाही , पण तरी , मला जाणून घ्यायचं होत , तिच्याशी काहीतरी बोलावं असं सारखं वाटत होत . 

" भाऊबीज जवळ येते आहे " 

 " अं " 

" नाही म्हटलं भाऊबीज जवळ येते आहे आपले नाव कळू शकेल का ?

" नाही मी देऊ शकत . माझ्या नवऱ्याला राग येईल " 

" भाऊबीज जवळ येते असं म्हटलं मी याचा अर्थ "

" हो समजलं आहे मला , कोणत्याही दुसऱ्या पुरुषाशी मी बोललेले तर माझ्या नवऱ्याला आवडत नाही , आणि मानलेली नाती तर मुळीच नाही त्याला राग आला तर मला मारेल हि . " शांतपणे ती म्हणाली . 

' अरे बापरे ' मी मनात म्हटलं 

पुढच्या संवादालाच तिने पूर्णविराम दिला . 

तरी मला स्वस्थ बसवत नव्हतं 

" तुम्ही कुठे उतरणार , माहेरून सासरी जात आहात का ? " मी साधारण अंदाज केला 

" हो बावड्याला " 

काही वेळाने 

" गगनबावडा , गाडी दहा मिनिटे थांबेल "  कंडक्टर ओरडला . 

सर्व प्रवासी खाली उतरले ती मुलगीही आपली ब्याग घेऊन खाली उतरली तिच्या पाठोपाठ मीही उतरलो . माझ्याकडे पाहत स्माईल करून ती  स्टँडच्या गेट कडे जाण्यासाठी चालू लागली.

तीला न्यायला नवरा  येईल कि कुणी , नवरा येणं  शक्यच नाही दोन वाक्यातच तिने तिच्या नवऱ्याची ओळख करून दिली होती  ,

" माझ्या नवऱ्याला आवडत नाही , आणि मानलेली नाती तर मुळीच नाही त्याला राग आला तर मला मारेल हि ." 

मी तर्क करीत होतो इतक्यात एक पंधरा लाखाची गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली . मागचा दरवाजा उघडून ती आत बसली , म्हणजे नवरा नाही , गाडी आणण्यासाठी पाठवून दिली 

"  त्याला राग आला तर मला मारेल हि " हे शब्द मला अस्वस्थता आणणारे होते , 

"कसे आयुष्य ती काढत असेल"या कल्पनेनेच एक कळ  माझ्या हृदयातून गेली 

नवरा पैशाने खूप श्रीमंत होता , पण आयुष्य सुखी होण्यासाठी मन श्रीमंत असावं लागत , पैशाने नाही सुख विकत घेता येत !


 

चाकर मानी

                                                                                     । ।   श्री   । । 


चाकर मानी
 

                         शब्दाचा इतिहास 


एक सत्तर ऐशी वर्षांपूर्वी कोकणात उत्पन्नाचे साधन काहीच नव्हतं , म्हणजे शेती होती पण एकाच कुटुंबाला पुरेल इतकी , मुलगे त्यांच्या पत्नी त्यांची मुले , कुटुंब वाढत गेलं , आणि शेती खूपच अपुरी पडायला लागली . मुलांना उत्पन्नाची साधनं  शोधण्याची गरज भासली , त्यावेळी कोकणात व्यवसाय हा दृष्टिकोन एक कल्पनाविलास होता , नोकरी / चाकरी करणे हा एकमेव पर्याय होता , बरं   नोकरी कोकणात मिळणे कठीणच , शिक्षण हि गोष्ट पूर्णपणे ऐच्छिक होती.  ज्याला  त्यावेळी शिक्षणाचे महत्व कळले तेच शिक्षण घेत, पण ती सुद्धा पाच ते दहा टक्के  , त्यामुळे शहरात जाऊन नोकरी करणे हाच एकमेव पर्याय राहिला . त्यात काही तरुण शहरात जायला मिळते म्हणून नोकरी करत , तर काही अगदी मना विरुद्ध इच्छा नसतांना जबरदस्तीने नाईलाजास्तव शहरात नोकरीला जात होते.

आता सणासुदीला जेव्हा हे तरुण गावाकडे रजा काढून येत. तेव्हा गावात राहणारी मंडळी त्यांना “ या चाकरमानी “ असे कौतुकाने म्हणत असत . नोकरी करणारा तो चाकर मानी , यात कमीपणाची कुठलीही भावना नव्हती . कारण चाकरी करण्याची किती गरज आहे हे प्रत्येक गावात राहणाऱ्याला माहित होत . आणि म्हणूनच ‘ या चाकरमानी ‘ असे म्हणतांना त्यात प्रेम कौतुक आदर होता . 

कालांतराने दृष्टिकोन बदलतात त्यामुळे काळ बदलतो ,आणि चाकरमानी उपहासात्मक म्हणू लागले , कमीपणाचे वाटू लागले त्यामुळे काही बुद्धिहीन असलेले बुद्धिवान , चाकरमानी यांना कोकण वासी म्हणू लागले 

पण या तथाकथित बुद्धिवाद्यांना हे कुठे समजण्याची अक्कल आहे कि - कोकणात राहणार स्थायिक त्याला कोकणवासी म्हणतात आणि जो नोकरी करणारा तो चाकरमानी , सध्याचा काळात  जो कोकणात नोकरी करतो तोहि  चाकरमानी च असतो    

                                                    Vinata Social media 


फॉरवर्ड करण्याची संस्कृती

 आठवतात ते दिवस

आजची forward करण्याची संस्कृती .......
मी मध्ये एका संगीत गाण्याच्या ( live instruments ) स्पर्धेला गेलो होतो . अर्थातच माझ्या मित्राने त्यात भाग घेतला होता. आपल्या नित्यनियमा प्रमाणे पाहुण्यांचे व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत आभार प्रदर्शन झालं. आणि वेळ जाऊ नये म्हणून आयोजकांनी लगेच कार्यक्रमाला सुरवात करावी अशी घोषणा केली . साऊंड सिस्टिम वाल्याची धावपळ सुरु झाली कसेबसे त्याने पटकन माईक लावून घेतले कार्यक्रम सुरु झाला . आता गाण्यांचा कार्यक्रम , त्यातून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजिचा साऊंड त्याला जवळ पास पाच पन्नास विशिष्ठ ऍडजेस्ट मेन्ट केल्याशिवाय तो नीट येतच नाही. बरं त्या टेकनॉलॉजिचा अभ्यास त्या ऑपरेटरचा किती आहे हा एक संशोधनाचाच विषय असतो . व्हायचे तेच घडले पहिल्या स्पर्धकांचा आवाज काही नीट आला नाही , त्यामुळे त्याच्या गाण्याची काशी झाली . आणि आताचे परीक्षक ऍडव्हान्स टेकनॉलॉजि वापरल्या शिवाय गायकाचे कौशल्य समजण्याची त्यांची क्षमता नाही .काल संगीत शिकावयास घेतले आणि आज परीक्षक झालो . मीडियाची कृपा ! त्यामुळे पहिले दोनतीन स्पर्धक साउंड बरोबर नाही म्हणून बाद झाले. ( हा त्यांच्यावर अन्यायच झाला नाही का ? ) पण हे बघतो कोण अगदी अयोजकांसकट आम्ही फक्त forward करणारी मंडळी. विचार आमचे थांबलेले आहेत , अभ्यास करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे . आवाज येतो आहे ना बस झालं .
तो काळ मात्र असा नव्हता , दोनतीन माईक आणि एक साधे लोकांपर्यंत आवाज पोचेल याच क्षमतेचे मशीन. परीक्षक म्हणून जाण हेच सन्मानाचे प्रतीक होते .. त्यामुळे परीक्षकांचा अभ्यास त्याचे अनुभव त्यांची संगीतातली तपश्चर्या हे सर्व पाहूनच परीक्षक म्हणून बोलावीत असत आणि व्यवहार जमला नाही म्हणून परीक्षकाला बोलावता आले नाहीं असें कधीच व्हायचे नाही कारण किती रकमेचे मानधन हा दृष्टिकोनच नव्हता. गायकाचा आवाज परीक्षका पर्यंत पोचणं हेच महत्वाचे होत साऊंड सिस्टीम आवाज जरी गुणवत्तेने उच्चं नसला तरी गायकाचे आणि इतर कलाकारांचे गुणकौशल्य समजण्याची परीक्षकांची क्षमता होती . त्यामुळे कोणत्याच स्पर्धका वर कोणत्याच गोष्टी मुळे अन्याय होत नसे . या विषयावर खूप काही सांगण्यासारखे आहे . पण तूर्तास इतकेच बास नाहीतर अजीर्ण होईल
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी सर्वांनाच स्पर्धका पासून आयोजकांपर्यंत अभ्यासाची कष्ट घेण्याची गरज आहे. आजच्या फॉरवर्ड करण्याच्या संस्कृतीत ते बसत नाही.
धन्यवाद Vinata Social


 

मुंबई लोकल ट्रेन
#सर्व लोक एकाच वेळी इतकी चेंगराचेंगरी करून हीच गाडी मिळाली पाहिजे असा आग्रह का धरतात ? ,
प्रत्येक जण कुठेना कुठे पोटापाण्यासाठी नोकरी करणारा नोकरदार असतो. त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे नोकरीला जाता येत नाही हि वस्तुस्थिती आहे ,
प्रत्येकाला वेळेची बंधने असतात , उशिरा नोकरीवर गेलं तर नोकरीवर गदा, मग काय करणार अगतिक होऊन चेंगराचेंगरीतून जाणे भाग पडते ,
सगळ्यांच्या ऑफिस च्या वेळा एकच मग बिचारे नोकरदार तरी काय करतील अश्या ह्या लोकांच्या अगतिकतेचा कोणत्याही शासनाने चुकून तरी विचार केला आहे का ?
#आता अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जनताही तितकीच जबाबदार आहे
त्यांना शहरातील जीवन शैलीचे फार आकर्षण , म्हणजे असे कि मोठ्या शहरातील नोकरी सोडून इतर ठिकाणी नोकरी मिळण्याची संधी मिळाली तरी ती नाकारतात , मुंबईसारख्या मोट्या शहरात इतक्या त्रासदायक अडचणी असूनही मुंबईतच स्थायिक व्हायचे असा अट्टाहास का ?
# मग ह्या लोकलच्या गर्दीवर प्रशासन जो काही मार्ग काढेल तो जनतेला मान्य करावा लागेल
#अनेक वेळा असेही होते कि कॊटुंबिक आर्थिक स्थिती चांगली नसल्या मुळे अनेक तरुणांना मर्जी विरुद्ध मोठ्या शहरात नोकरी करणे भाग पडते
अश्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे , हि परिस्थिती काही एकदोन वर्षात झालेली नाही. माझ्या माहिती प्रमाणे गेली तीस चाळीस वर्ष हाच रगडा चालू आहे .
# याचे एका वाक्यात उत्तर मिळणारे नाही , आणि एखादी कृती करूनही हा प्रश्न सुटणार नाही
# ज्यांना मुंबई सोडून अन्य ठिकाणी स्थायिक होणं शक्य असेल तर त्यांनी त्वरित विचार करावा .
# तसेच ज्या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना मुंबई किंवा मोठ्या शहराच्या बाहेर असणाऱ्या शाखांमध्ये रुजू करता आलं तर पाहावे .

आठवतात ते दिवस .................01

आठवतात ते दिवस .................

मला अजूनही आठवतंय , १९८५/८६ चा काळ असावा त्यावेळी मुंबईला आम्हा कलाकारांचा एक ग्रुप होता. नेहमीचेच कार्यक्रम नको म्हणून आम्ही , आज “ होऊन जाऊदे धिंगाणा “ नावाचा जो कार्यक्रम आज दूरदर्शन वर चालतो तश्याच पद्धतीचा एक कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर करण्यासाठी आम्ही बसवला.
१९७२ साली मुंबई दूरदर्शन चा स्टुडिओ सुरु झाला , पहिले “ मुंबई दूरदर्शन “ हेच नाव होत नंतर “ सह्याद्री “ झालं . त्या वेळेला आजच्या सारखा पैशांचा खेळ नक्कीच नव्हता
आणि याकूब सईद आणि बबन प्रभू हि जोडगोळी खूपच प्रसिद्ध होती. याकूब सईद हे कार्यक्रम हेड असल्यामुळे कार्यक्रम सादर करावयाचा असेल तर त्यांना भेटावं लागायचे
. त्यांच्या भोवती आजच्यासारखे ग्लॅमरस वलय नव्हतं आणि त्यामुळे त्यांची भेटही सहज होत असे. आम्ही आमच्या कार्यक्रमाची संकलपना सांगितली आणि थोडी कार्यक्रमाची फित हि दाखवली .त्यांनी पहिली आणि आम्हाला ऑफिस मध्ये घेऊन गेले. " कसं आहे वेलणकर " ते बोलते झाले तुम्ही कार्यक्रम कसा सादर केला आहे हे आम्ही पाहतोच पण त्याचा प्रमाणे काय सादर केले आहे हेही पाहणे गरजेचे आहे ,तुम्ही चांगल सादर केले असल तरी असा पोरखेळ आम्ही नाही दाखवणार , अस्या प्रकारच्या कार्यक्रमाची प्रेक्षकांना गोडी लागली तर रोज आम्हाला असे पोरखेळच करावे लागतील , तेव्हा सॉरी , आपल्याकडे चांगले चांगले लेखक आहेत त्यांच्या नाटिका सादर करा आपण नक्की दूरदर्शन वर दाखवू.
त्यानंतर आमच्या ग्रुपचे नाटक झालं , कीर्तन हि झाले शालेय कार्यक्रम केले ,सेलिब्रेटींनीच कार्यक्रम सादर करावे अशी संकुचित वृत्तीही नव्हती असो पण आम्हाला धिंगाणा काही घालू दिला नाही ( त्यांच्या भाषेत पोरखेळ )
" अस्या प्रकारच्या कार्यक्रमाची प्रेक्षकांना गोडी लागली तर रोज आम्हाला असे पोरखेळच करावे लागतील "त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार काही प्रमाणात आज खरे ठरले हे नक्की !

 

ती फुलराणी

 


ती फुलराणी 

best TV सीरिअल 


सोनी मराठी वरील ऑगस्ट २०१८ पासून प्रसारित झालेली “ ती फुलराणी “ नुकतीच सिरीयल पहिली आणि दोन तीन दिवस खूप अस्वस्थ वाटत होत .
चैन पडत नव्हतं , काय करावं काही कळत नव्हतं . कशातच लक्ष लागत नव्हतं.
का ? का ? का अशी अवस्था झाली ?, एकदा दोनदा तीनदा सारखे पुन्हा पुन्हा एपिसोड पाहत होतो तरी मन समाधानी होत नव्हतं.
बुद्धीने सांगितलं …. असे व्हायला एकच कारण "मयुरी वाघ" . हो…. मनाने हि कौल दिला , हेच कारण
त्यावेळी ती सीरिअल किती पॉप्युलर झाली माहित नाही कदाचित मीडिया वाल्यांना भावले नसेल.आणि तसंही आज कलाकारांना विचारतो कोण कारण कला हे क्षेत्रच मीडियाच्या हातात गेलं आहे किंबहुना पैसाच ठरवतो कलाकाराचे कौशल्य . मयुरीच्या एका मुलाखतीतही असे दिसून हि आले कि आज कलाकाराच्या गुणांना कोण विचारतो !
सीरिअल मधील नायक सांगायचा तू न बोलताच तुझ्या मनातले कळत मला , हि नुसती नायकाची शब्द फेक नसून प्रेक्षकांनाही समजत होत मंजिरीला काय म्हणायचं आहे .केवळ तिचा चेहरा आणि डोळे पाहून वास्तवातच अशी मंजिरी व्यक्ती आहे कि काय अशी मनात शंका येऊ लागते. आणि वाटत मंजिरी सारखी मुलगी प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात यायला हवी .
यु ट्यूब वरचा मयुरीचा प्रत्येक एपिसोड वास्तवात जगावा तसा मी जगत होतो .प्रत्येक एपिसोड मध्ये मंजिरी अस्वस्थ करायची चेहऱ्यावर उमटणारे भाव आणि शब्दांविना बोलणारे डोळे " निव्वळ अप्रतिम "
यावरून समजत कि त्या व्यक्तिरेखरला मयुरी वाघ ने किती न्याय दिला आहे ,
अस्वस्थता जात नव्हती डोळ्यासमोरून व्यक्तिरेखा हलत नव्हती
डोळ्यासमोर मयुरी वाघ असतांनाच एक व्यक्तिरेखा उभी राहिली आणि एकत्र कुटुंबाचे महत्व सांगणारी हृदय हेलावणारी "संघर्ष " नावाची कथा फुलू लागली आणि मनातील अस्वस्थता कमी झाली. लवकरच शॉर्ट फिल्म स्टोरी प्रसारित होईल .
ती फुलराणीच्या टीम चे खूपखूप धन्यवाद कि मयुरी वाघ सारख्या गुणी अभिनेत्रीला मंजिरी हि व्यक्तिरेखा साकारायला दिली . एकूणच ती सीरिअल मनाला स्पर्शून जाते .
१९७५ चा काळ असावा त्यावेळी पु ल देशपांडे लिखित " ती फुलराणी " नाटक स्टेजवर आलं . तेव्हा मी सातवीत शाळेत शिकत होतो. त्यावेळी मी माझ्या कुटुंबाबरोबर ते नाटक पाहिलंही असेल , पण आता लक्षात नाही . आणि नाटक समजून लक्षात राहील असं माझं वयही नव्हतं .
अश्या गुणी अभिनेत्रीला उत्तरोत्तर अश्याच आव्हानात्मक भूमिका मिळाव्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना
- गणेश वेलणकर

दीप अमावस्या - आषाढ अमावस्या

                                                                      ।। श्री ।। 


                                  आषाढ अमावस्या - दीप अमावस्या 

                                     सोमवार १७ जुलै २०२३ रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच  दीप अमावस्या आहे. आषाढ अमावस्येनंतर येणाऱ्या पूजांच्या तयारीसाठी घरातील सर्व दीप स्वच्छ करून भक्तिभावाने पुजले जातात . अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीप मांगल्याचे प्रतीक आहे .दीपपूजन करून गोडाधोडाचे नैवेद्य दाखवतात , दीप आरती म्हणतात .सर्वदिप प्रज्वलित करून पूजा करतांना इतकं प्रसन्न आणि आनंदमय वातावरण होत.आणि एक उत्साहाची लहर शरीरात उत्पन्न होते .

या दिवशी मांसाहार करून पुढे अनंत चतुर्दशी पर्यंत मांसाहार करीत नाहीत .पण सध्या या बेधुंद आणि बेबंध राहणाऱ्या काही समाज कंटकांनी गटारात लोळण्याची वेळ येईपर्यन्त दारूच्या बाटल्या ढोसून so called " गटारी अमावस्या " म्हणून या दिवसाची निर्बत्सना केली . आणि दुर्दैव असे कि सोसिअल मीडियावर मुद्दाम मुद्दाम गटारी अमावस्या म्हणून उल्लेख केला जातो काही वाहिन्यांनी तर कहरच केला - चित्रपटाची जाहिरात करतांना " गटारी स्पेशल " म्हणून उल्लेख करतात . खरंतर दारू ढोसणाऱ्याला दिवस आणि मुहूर्ताची काही गरज नसते - आली लहर केला कहर अशी त्यांची अवस्था असते . पण जाणूनबुजून संस्कृती बद्दल गैरसमज वाढवणाऱ्या या वळवळत्या किड्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ज्याचे जे वैशिष्ठ्य आहे ते अबाधित राहत हे पक्के ध्यानात ठेवाव

अनेक साईटवर दीप अमावास्येची माहिती दिलेली असते , आणि काही साईटवर शेवट अशी टीप लिहिलेली असते कि " येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. " बरोबरच आहे कारण शास्त्राला " अनुभूती " म्हणजे काय हे कळतच  नाही , शास्त्र तिथपर्यंत पोचूच शकत नाही मग  शास्त्र कसले पुरावे देणार !

                                                                                                                      ...... मालकंस 

  अधिक मास 

                                                                   पुरुषोत्तम मास 


                                             आपली हिंदू कालगणना , पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती , पृथ्वीची स्वतः भोवती फिरण्याची गती आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची गती या तीन  परिमाणांवर केली जाते म्हणजेच सौरवर्ष आणि चांद्र वर्ष . या तीन  गतींमध्ये दरवर्षी अकरा दिवसांचा फरक पडतो .आणि हा फरक भरून काढण्यासाठी बत्तीस  महिन्यांनी  अधिक मास घेतला जातो ज्या महिन्यात रवीची संक्रांत होत नाही .आणि हा काळ आषाढ आणि श्रावण या दोन महिन्यांमध्ये असल्यामुळे अधिक श्रावण येतो .

                                       अधिक महिन्यात , मुलगी आईची ओटी भरते तसेच जावयाला , ब्राह्मणाला , गाईला अधिक महिन्यात वाण देतात अधिक मास - या वर्षी - १८ जुलै २०२३ प्रतिपदा  ते १६ ऑगस्ट २०२३ अमावस्या .

                                      बाकी आपण श्रावण सोमवार  , इतर उपवास , व्रत वैकल्य पारायण वाचन हे श्रावण महिन्यातच करावे . श्रावण मास -  या वर्षी - १७ ऑगस्ट २०२३ प्रतिपदा  ते १५ सप्टेंबर २०२३ अमावस्या

         या वर्षी श्रावण सोमवार - २१ ऑगस्ट २०२३ /  २८ ऑगस्ट २०२३ /  ४ सप्टेंबर  २०२३ / ११ सप्टेंबर  २०२३

अधिक महिन्यात दशमी , एकादशी , द्वादशी पौर्णिमा या दिवशी दान देतात .अधिक महिन्यात गंगास्नान हि करावे . अनारसे ,बत्तासे पेढे यांची दान दिली जातात . 

                                अधिक  मासात विष्णू स्वरूप कृष्णाचे महत्व असल्यामुळे कृष्णाला अधिक मासात दररोज तुळशी वाहून लोण्याचा नैवेद्य दाखवतात 

                                                                                                  ..................................मालकंस 

                                                                                                                          विनता उद्योग समूह 

वैवाहिक जीवन - विनता सोसिअल - मराठी - भाग १ - Vaivahik Jivan - Part १

                                        वैवाहिक जीवन 

भाग १
                " आमच्या वेळी असं होत ,,आमच्या वेळी तसं होत ,,  आम्ही खरं आयुष्य जगलो " 
                       छे ,ऐकून ऐकून कंटाळा आला आहे , जुन्या  काळातलं सांगत राहतात 
                 अहो काळ किती बदलला आहे , आता जुन्या गोष्टी काही राहिलेल्या नाहीत .
               खूप बदललेल्या आहेत 
कोण  सांगणार यांना ?
गोष्टी बदलेल्या आहेत ? खरंच असं वाटत ?
साठ सत्तर वर्षांपूर्वी पुरुष जसा होता तसाच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी स्त्री जशी होती तशीच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी दोचांमध्ये ज्या भावना होत्या त्या आजही आहेत 
संतती होण्यासाठी दोघांनी एकत्र येणं हे आजही गरजेचं आहे जे पूर्वीही होत
स्त्री पुरुष दोघांनाही एकमेकांचा सहवास , हवाहवासा आजही वाटतो .
या सर्व जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत नैसर्गिक गरजा आहेत त्या आजही तश्याच आहेत 
मग बदललं काय ?
" विचार "
" तंत्रज्ञान "
तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला !
विचार बदलले तसे आचारही बदलले .
विचार बदलले  तश्या अपेक्षा . राहणीमान , भावनांचा अग्रक्रम बदलला 
तंत्रज्ञानाचा पगडा विचारांवर इतका पडला कि 
काय करावं , काय करू नये , याचा सारासार विचार करण्याची क्षमता कमी झाली 
 प्रेम वात्सल्य ,त्याग ,आदर, विनम्रता , विश्वास  ,संयम आणि स्वार्थ .या भावना आजही मनात आहेत 
पण .......
भ्रामक सुखाच्या अति मागे लागल्यामुळे स्वार्थ या भावनेने बाकी भावनांना बांधून ठेवलं
चार भिंतीत एकत्र राहत असले तरी एकमेकांपासून फार दूर 
मी आणि माझं विश्व् या भोवतीच फिरत राहिलो .
सामाजिक विचारांच्या बदला मुळे
स्त्री घराबाहेर पडली , पूर्वी   कधी जे तिने विश्व् बघितलं नाही त्या विश्वात ती लीलया रमायला लागली.
स्त्रीच्या आचारतेत झालेला हा बदल खरंच व्यक्ती म्हणून निर्विवाद कौतुकास्पद आहे .
पण हे कौतुक काही अंशी पुरुषाला मानवल नाही . 
आणि 
जीवन होडीच्या मध्यावर हातात हात घालून उभी असलेली ती दोघं 
होडीच्या दोन टोकावर जाऊन राहिली .


  

कलेचा बाजार


    ।। श्री ।।


                                                      बाजार 


मला अजूनही आठवतात ते दिवस साधारण सन १९८४ /८५ चा काळ असेल , त्या वेळी मुंबई दूरदर्शन वर “ गजरा “ म्हणून एक कार्यक्रम असे. त्यावेळच्या प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेले , त्यामध्ये छोटे छोटे प्रवेश असत कि ज्यामधून , विनोदी ,गंभीर ,सामाजिक प्रश्न ,समाजातील अनेक व्यक्तींच्या स्वभावाचे पैलू , अश्या विविध अंगांनी हा कार्यक्रम सादर व्हायचा . विशेष म्हणजे  दूरदर्शन वरचा प्रेक्षक वर्ग आठवड्यातून एकदाच असला तरी वार  लक्षात  ठेऊन आतुरतेने पाहत होता कारण तो अत्यंत जिवंत होता ,उत्कृष्ठ लेखन , दिग्दर्शन कलाकार ,सर्व सर्वच अफाट असायचं कलेतील आविष्कारांचे सुंदर दर्शन घडत असे . महत्वाचे म्हणजे दूरदर्शन वरच्या कार्यक्रमाची लोकप्रियता हि कलाकारांवर ठरत असे ! त्यामुळे  प्रमोशन , वारंवार कार्यक्रमाच्या जाहिराती हे करण्याची गरजच नव्हती कारण जे मुळातच उत्कृष्ठ आहे ते सारखे सारखे कधीच सांगावं लागत नाही कि हे उत्कृष्ठ आहे !. फुल खिले हैं गुलशन गुलशन , आपली माती आपली माणसं  , चित्रहार नाटक एकांकिका मुलाखती लहान मुलांसाठी किलबिल 

         त्यावेळी दूरदर्शन वरचे कार्यक्रम मोफत होते पण दर्जेदार होते. 

हे आज प्रकर्षाने आठवलं कारण “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ सीरिअल पाहून...... 

वडिलांचा लाथेने फेटा उडवला जातो इतका त्यांचा अपमान होतो  तसेच हाडाची शिकशीका असतांना तिच्या पावित्रावर  शंका घेणारे खोटारडे आरोप केले जातात . असे असतांना हि ती शिक्षिका मी कशी पवित्र आहे याचे लाजिरवाणी समर्थन देते आहे .  

वास्तविक हे सर्व पाहिल्या आणि ऐकल्यानंतर तिच्या पायाची आग मस्तकात जायला हवी होती .  “ कुणा कुठल्या  गुंडाने सांगितलेलं तुम्हाला खरं  वाटत. आणि माझ्यावर तुमचा विश्वास नाही . आज लग्नाच्या दिवशी इतका अविश्वास मग लग्न झाल्यावर मला “ बाजारी औरत “ म्हणूनच घोषित कराल , मलाच तुमच्या या नंदीबैलाशी लग्न करायचं नाही , ताबडतोब चालते व्हा इथून ”.व्यक्तिरेखा हि त्याच्या स्वभाव आणि विचारांप्रमाणे वागत असते हेच आताच्या लेखकांना समजत नाही . 

         27 जून २०२३ चा भागाचं  लिखाण तर इतकं दयनीय होत कि सीरिअल पाहणेच सोडून दिल .    आजच्या एकूण मराठी दूरदर्शन वरच्या सीरिअल बघून एकूणच निर्मितीची दयनीय अवस्था झाली आहे , 

आज कार्यक्रमाचा दर्जा कलाकार नाही , तर मीडिया म्हणजे पर्यायाने multinational कंपन्या ठरवतात . बाजारात विक्रीला असलेल्या वस्तू प्रमाणे !


                     असेच दर्जेदार लेख वाचण्यासाठी यावर क्लिक करा 


Next

लेखणी

                                                                । ।   लेखणी । । बघा पटलं तर  …….. लहान पणी शाळेत असतांना आजच्यासारखे online ...