लेखणी

   


                                                            । ।  लेखणी । ।


बघा पटलं तर 


……..लहान पणी शाळेत असतांना आजच्यासारखे online  , डिजिटल सोशिअल मीडिया वगैरे असले काही प्रकार नव्हते . त्यावेळचे एकच प्रभावी माध्यम म्हणजे पुस्तक ! Tv माध्यम अगदीच १०% लोकांकडे ,त्यामुळे जसे आईवडिलांनी आमच्यावर संस्कार केले तसेच या पुस्तकांनीही बरच  काही शिकवलं ! शालेय जीवनाबरोबरच विद्यालयात शिक्षण घेत असतांना खऱ्या अर्थाने लेखणीशी संबंध आला .त्याचे असे झाले संवाद करणे किंबहुना संवाद घडवणे हे माझ्या रक्तातच होते , एकदिवस विद्यालयाचे प्राध्यापक म्हणाले , आपल्या विद्यालयाच्या कला विभागाच्या वार्षिकामध्ये तुझ्यासाठी दोन पाने ठेवली आहेत , विषय तूच निवड पण चर्चा खुप केल्यास, आता लेखणी हातात घे .केवळ शिक्षकांच्या आग्रहाखातीर मी पहिल्यांदा लेखणी हातात घेतली , त्यावेळी “ श्री आचार्य अत्रे , पु.ल. देशपांडे , व.पु . काळे , रत्नाकर मतकरी , सुरेश खरे अश्या दिग्गज लेखकांची पुस्तके आणि लेख वाचनात आले . किंबहुना त्यांचे लेख किंवा पुस्तक वाचणे एक व्यसनच लागले होते .त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा प्रभाव माझ्यावर झाला होता.लेखणीची ताकद काय असते ती  श्री आचार्य अत्रेयांच्या लिखाणातून दिसत होती इतकेच कशाला इतिहासाची पाने उलगडून पहिली तर कळते लोकमान्य टिळकांच्या लेखणीला किती ताकद होती त्यांच्या नुसत्या लिखाणाने इंग्रज सरकार खडबडून जागे व्हायचे .

                                                                                            या लेखणीचे एक वैशिष्ठ्य होत कि ज्याने लेखणी हातात घेतली त्याला ज्ञान , अनुभव , आणि विचारांचे विचार मंथन करण्याची सवय  , आणि लेखणी चालवण्याची कला या सर्व गोष्टी आवश्यक होत्या तरच त्याची लेखणी तळपायची ! त्यावेळी अनेकांच्या लेखणीने समाजसुधारण्याचा जणू विडाच उचलला होता .यामध्ये कवी मनही मागे नव्हते काही कवींच्या लेखणीतून अश्या कविता लिहिल्या जायच्या कि वाचल्या नंतर अन्याय विरुद्ध लढण्याचे धैर्य निर्माण व्हायचे काहींच्या कविता वाचल्यानंतर डोळ्यातून घळाघळा पाणी यायचे. लेखणीचा परिणाम प्रत्येक दिवशी दिसत असे , किंबहुना योग्य  मार्गाने जाणारे इतिहास ही या लेखणीने घडवले  . लेखणीला दुधारी तलवार असेही म्हणत !

कोणीही येईल आणि लेखणीला हातात घेईल हे लेखणीलाच मान्य नव्हतं जेव्हा गाढ अनुभव ,प्रामाणिक अभ्यास , लिखाणाचे  तारतम्य ,  बुद्धिमत्ता आणि लेखणीला चालवण्याचे कष्ट ! हे सर्व ज्याचे जवळ असतील  त्याच्याच लेखणीला ताकद यायची, त्यामुळे फाजील व्यक्तिस्वातंत्राला वावच नव्हता .  कुरघोडीही व्हायच्या पण त्याच्या पत्रावळी कधीच झाल्या नाहीत .,त्यात तारतम्य आणि संयम असल्यामुळे कचरा होण्याची शक्यताच नव्हती 

                                                                                  लेखणीची धार ……..आता लेखणीच कुठे दिसते , मोबाईल च्या रीळ ने तिला कधीच गिळंकृत केले आहे , लेखणी गेली तशी वाचून पेटून उठणारी मनेही संपली . आता दिसतात त्या फक्त एकमेकांवरील कुरघोडींच्या पत्रावळी , ज्यातून काहीच निष्पन्न होणार नाही . झालेच तर कायमस्वरूपीचे वाद आणि मारामाऱ्या . कोणीही यावं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे धिंडवडे काढावे अशी गत  झाली आहे , तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला जातो . तारतम्य आणि संयम समाजामधून कधीच हद्दपार झाले आहेत !ज्याची समाज सुधारणे साठी , आणि समाज शांततेसाठी अत्यंत गरज असते. समाजात पुन्हा लेखणी चे अस्तित्व येईल का ? 

                  —------------------------------------- क्षितिजा —---- गणेश वेलणकर ……. क्षितिज सोशिअल मीडिया 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Next

लेखणी

                                                                । ।   लेखणी । । बघा पटलं तर  …….. लहान पणी शाळेत असतांना आजच्यासारखे online ...